Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ई-हक्क आज्ञावली बाबत कार्यशाळा संपन्न ई-हक्क प्रणालीचा नागरीकांनी वापर करावा :: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
November 16, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी
नंदुरबार  l
जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणीकृत दस्तवगळता इतर फेरफार जसे वारस फेरफार, इतर हक्कातील नावे कमी करणे, अज्ञान पालनकर्त्यांचे नावे कमी करणे, मयताची नावे कमी करण्याबरोबरच संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली शासनाने विकसित केली असून या प्रणालीचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत ई-हक्क व ई-चावडी आज्ञावलीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेस सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार श्रीमती.सरीता नरके, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री म्हणाल्या की, नागरिकांना नोंदणीकृत दस्तवगळता इतर फेरफार, इतर हक्कातील नावे कमी करणे, अज्ञान पालनकर्त्यांचे नावे कमी करणे, मयताची नावे कमी करण्याबरोबरच संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्तीसाठी महसुल विभागामार्फत ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली असून ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी http://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx या संकेतस्थळावर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज व कागदपत्रे दाखल करता येईल. तरी नागरिकांनी या नवीन प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अपर जिल्हाधिकारी श्रीमती.नरके म्हणाल्या की, ई-चावडी प्रकल्पातंर्गत ई-चावडी प्रणाली विकसित करण्याचे काम शासनस्तरावर सुरु आहे. यामुळे अष्टसुत्री कामकाज पुर्ण असणाऱ्या गावांचा समावेश ई-चावडी प्रकल्पात तात्काळ करता येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रथम भाग अद्यावतीकरण पूर्ण असणारी गावे निश्चित करणे आवश्यक आहे.जेणे करुन प्रत्येक जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प कार्यान्वित करता येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-चावडी, ई-फेरफर व नव्याने विकसित ई-हक्क आज्ञावलीची माहिती दिली. प्रशिक्षणास सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्याभरात स्वच्छता अभियान

Next Post

वर्षभरात रस्ते अपघातांची संख्या घटली : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Next Post
खबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर

वर्षभरात रस्ते अपघातांची संख्या घटली : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add