नंदुरबार l प्रतिनिधी
संत निरंकारी मंडळाच्या नंदुरबार शाखेचे सेवादल युनिट क्रमांक 1299 मधील सुमारे 110 साधक नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय सत्संगासाठी मंगळवारी नंदुरबारहुन रवाना झाले.
मंगळवारी दुपारी नांदेड सचखंड एक्सप्रेसने नंदुरबार जिल्ह्यातील महिला पुरुष साधक रवाना झाले.सद्गुरु माता सुदिक्षाजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील संत निरंकारी मंडळाचे साधक रवाना झाले.याप्रसंगी घोषणा आणि भजन गीतांद्वारे साधकांनी आपल्या प्रवासाला प्रारंभ केला.








