नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबे यांनी नियुक्ती झाली आहे.
शासनाच्या गृह विभागाने नुकत्याच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.त्यानुसार नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांनी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे.
या आधी नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून विजय पवार हे कार्यरत होते.निलेश तांबे हे सध्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मालेगाव, नाशिक (ग्रा) येथे कार्यरत होते.








