Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 400 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, आ.राजेश पाडवी यांचा स्तुत्य उपक्रम

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 400 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, आ.राजेश पाडवी यांचा स्तुत्य उपक्रम
तळोदा l प्रतिनिधी
                जनजातीय गौरव दिनानिमित्त आमदार राजेश पाडवी, कै. कलावती पाडवी फाऊंडेशन, सोमावल व ग्रॅव्हिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी (ता. १२) मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४०० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.
              तळोद्यातील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे सदर शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, योगेश पाडवी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा, माजी सभापती सतिष वळवी, जितेंद्र पाडवी, दाज्या पावरा, अर्जुन वळवी, नितीन पाडवी, कैलास चौधरी तसेच सरपंच श्रीकांत पाडवी, रुपसिंग पाडवी, अनिल पवार, भरत चौधरी, शानुताई वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी सुमारे ४०० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. नागरिकांची हृदयरोग, मधुमेह, मेंदूरोग, हाडांचे व मणक्याचे आजार, रक्तदाब, दमा यासह विविध आजारांची तपासणी करीत त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आलेत. तसेच नागरिकांवर अँजिओग्राफी व इतर पुढील उपचार नाशिक येथे मोफत करण्यात येणार आहेत.
               यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, सदर शिबिर हे सर्वांसाठी असून शिबिरात नागरिकांची तपासणी करून, त्यांच्यावर पुढील उपचार, शस्त्रक्रिया विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तसेच विविध योजनांचा लाभाव्यतिरिक्त नागरिकांना अधिकच्या खर्च लागल्यास तो खर्च कलावती फाऊंडेशन व इतर ट्रस्ट मार्फत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सुर्यवंशी यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. आशुतोष उशीर, डॉ. मेहुल सरकार, डॉ. अमोल खोलमकर, डॉ. बिपीन पटेल, डॉ. डी. एस. मुळे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. दिपक पाटील, डॉ. अनुज नेहते, सचिन कोतवाल तसेच विरसिंग पाडवी, गुड्डू वळवी, किरण सुर्यवंशी, हेमराज पवार, राजू गाडे, अँड. जयस्वाल, चेतन शर्मा, पावबा ठाकरे, ग्रॅव्हिटी मल्टीस्पेशीएलिटी हॉस्पिटलचे कर्मचारी व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण

Next Post

मोरवड येथे उपसरपंच पदी ज्योतीबाई रंजीत चौधरी यांची निवड

Next Post
मोरवड येथे उपसरपंच पदी ज्योतीबाई रंजीत चौधरी यांची निवड

मोरवड येथे उपसरपंच पदी ज्योतीबाई रंजीत चौधरी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add