Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

team by team
November 11, 2022
in राजकीय
0
थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

नंदुरबार | प्रतिनिधी

 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माहे ऑक्टोंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील १८, अक्कलकुवा ३१, अक्राणी-४७, तळोदा-१, शहादा-१० व नवापूर १६  अशा एकूण १२३ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या ग्रामपंचायतींमध्ये नव्याने निर्मित झालेल्या ५८ ग्रामपचांयतींचा समावेश आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील १८, अक्कलकुवा ३१, अक्राणी-४७, तळोदा-१, शहादा-१० व नवापूर १६  अशा एकूण १२३ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या ग्रामपंचायतींमध्ये नव्याने निर्मित झालेल्या ५८ ग्रामपचांयतींचा समावेश आहे.यात नंदुरबार तालुक्यातील २, अक्कलकुवा ३, अक्राणी-४७, तळोदा-१, शहादा-१२ व नवापूर तालुक्यातील ४  यांचा समावेश आहे.

 

 

 

तहसिलदार शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करतील, नमुना अ अ मध्ये नमूद ठिकाणी  २८ नोव्हेंबर २०२२ (सोमवार)  ते २ डिसेंबर २०२२ (शुक्रवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.सोमवार ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्र  छाननी करण्यात येईल. बुधवार ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. बुधवार ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

 

 

 

 

रविवार १८ डिसेंबर २०२२ रोजी  सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ .३० वाजेपर्यंत मतदान होईल, तर मंगळवार २० डिसेंबर २०२२  रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकार्‍यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील ) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना शुक्रवार २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.जिल्ह्यात निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.असे उपजिल्हाधिकारी  नितीन सदगीर  (महसूल प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

नंदूरबार तालुक्यात १८ ग्रामपंचायती
नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रूक, रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, कानळदे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली या ग्रामपंचायतीत निवडणुका आहेत.

 

 

धडगाव तालुक्यात ४७ ग्रामपंचायती
धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक, मक्तारझिरा, मांडवी खुर्द, वावी, खडकला खुर्द, जुगणी, बोदला, निगदी, भमाणे, भाबर, उडद्या, राजबर्डी, कुवरखेत, कात्रा, तेलखेडी, कुकलट, शेलकुई, वलवाल, तोरणमाळ, केलापाणी, खडकी, झापी, सिंदीदिगर , फलाई, भादल, कुंड्या, रोषमाळ खुर्द, कुंभरी, अट्टी, थुवानी, डुट्टल, कुकतार, डोमखेडी, गेंदा, माळ, खुटवाडा, शेलदा, पिंपळबारी, चांदसेली, बिजरी, सिरसाणी, गोया, कामोद खुर्द, चिखली, बिलगाव, त्रिशूल आणि सावया दिगर या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.

 

 

अक्कलकुवा तालुक्यात  ३१ ग्रामपंचायती
अक्कलकुवा, खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डणेल, मणिबेली, मोलगी,भगदरी, भाबलपूर, घंटाणी, विरपूर, सोरापाडा, अलीविहीर, बिजरीगव्हाण, खडकुना, टावली, मंडारा, खाई, कोलवीमाळ, कंकाळामाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, पेचरीदेव, ओहवा, वेली, उमरागव्हाण , चिवलउतार, माळ  या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका रंगणार आहेत.

 

 

शहादा तालुक्यात  १० ग्रामपंचायती
शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, निंभोरा, बहिरपूर, बिलाडीतर्फ हवेली,म्हसावद, धांद्रे बुद्रूक, पाडळदे बुद्रूक, कलमाडी तर्फ बोरद , जीवननगर या ग्रामपंचायतीत निवडणुका आहेत.

 

 

नवापूर तालुक्यात  १६ ग्रामपंचायती
नवापूर तालुक्यात शेही, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, वन्हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, गंगापूर, करंजवेल (नवनिर्मित), वाटवी ( नवनिर्मित), पाटी (नवनिर्मित), बेडकी ( नवनिर्मित) या ग्रामपंचायतीत निवडणुका होतील. तर तळोदा तालुक्यातील राजविहीर या एकमेव ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

 

 

 

जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आता ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापणार आहे. लोकनियुक्त सरपंच पद असल्याने अनेक इच्छुकांकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे.तर आता राजकीय पक्षांकडूनदेखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी तयारी करण्यात येणार आहे.दरम्यान, अचानक सार्वत्रिक निवडणुकींचा बिगुल वाजल्याने आता इच्छुकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीत सहभागाचे आवाहन

Next Post

खोक्राळेसह पूर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांना निवेदन

Next Post
खोक्राळेसह पूर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांना निवेदन

खोक्राळेसह पूर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add