नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथे भाजपातर्फे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हाचे पालक मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. विजकुमार गावीत उपस्थित होते तसेच खा.डॉ. हिना गावीत आणि जि. प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावीत उपस्थित होते.
यावेळी डॉ.सुप्रिया गावीत यांनी आपल्या आदिवासी बोली भाषेत जनतेशी संवाद साधला. गाव स्तरावरून जे कामे जिल्हा परिषद अंतर्गत होतील ते मी 100 टक्के करीन परंतु जर ते पुढे राज्य स्तरावर मांडायचे असतील तर आदिवासी विकास मंत्री यांच्या पर्यंत निवेदन पोहचवेल अजून पुढे काम नेटाने व्हावे यासाठी राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून खा. डॉ हिना गावीत यांच्या मदतीने ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करेल.तसेच ज्या आवश्यक योजना आहेत त्या पूर्ण करेल असे.डॉ.सुप्रिया गावीत म्हणाल्या.
खा.हिना गावीत म्हणल्या की, घरकुल चे काम करताना मा. गावीत साहेबांच्या मदतीने पुन्हा ड यादी वर्गातील घरकुल पूर्ण करून लोकांच स्वप्न समाधान करू असे सांगत वीज, रस्ते,शेती, आरोग्य, आणि शिक्षण यासाठी काम करू असे सांगितले.
या वेळी पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, नागरिकांच्या काय समस्या आहेत या समजून त्या प्रमाणे नियोजन करून पूर्वी योजनाचे वाटप केले.आता पुन्हा मंत्री झालो आहे मग आम्ही तिन्ही ठिकाणी काम विस्तारु तुम्हाला इकडं तिकडं जावं लागणार नाही सर्व कामे गावापासून दिल्ली पर्यंत होतील. सर्वे करून सर्व कामे पूर्ण करू. नवे उद्योग तयार करू.याठिकाणी आलेले अनेक प्रश्न आघाडी सरकार ने पूर्ण केली नाहीत ते पूर्ण करू. आजकाल दलबदलू लोकांना राजकारण जमत नाही ते तिथून इथे इथून तिथं भटकंती करतात,ते फक्त लालसे पोटी.मी तुमचा विचार करतो आणि करत राहणार असे डॉ.गावीत यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष आकाश अहिरे, शहर अध्यक्ष सुनील पावरा, जेष्ठ कार्यकर्ते आणि तालुका सरचिटणीस नीलिमाताई सुभाष पावरा, प. स. सदस्य बेबीबाई फत्तेसिंग पावरा, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष काळुसिंग पाडवी, तालुका युवा अध्यक्ष रोहित वळवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी यांनी परिश्रम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीव उदयसिंग पावरा यांनी केले.








