नंदुरबार l
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी ऍड.दिनेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडगल यांच्या हस्ते नुकतेच त्यांना देण्यात आले.
शहादा येथील विश्रामगृहावर नुकतीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात जात असल्याबाबत आंदोलनाची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडगल, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, प्रदेश सचिव ऍड.राऊ मोरे उपस्थित होते. यावेळी श्री.कडगल यांनी युवकांना मार्गदर्शन केले. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली खोंेडामळी येथील ग्रा.पं.सदस्य ऍड.दिनेश शामराव माळी यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसे नियुक्तीपत्र पुरुषोत्तम कडगल, ऍड.राऊ मोरे यांच्या हस्ते ऍड.दिनेश माळी यांना देण्यात आले. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, पं.स.सदस्य राजेंद्र बाविस्कर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप वना पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, ऍड.दानिश पठाण आदी उपस्थित होते.








