नवापूर l प्रतिनिधी
राष्ट्रवादीचा खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पोस्टरला जोडो मारून नवापूर बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे निषेध करीत पुतळ्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवापूर बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारुन पुतळ्या जाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदधिकारी यांनी केला मात्र वेळेतच नवापूर पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,तालुका सरचिटणीस मनोज वळवी,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्यध्यक्ष तथा नगरसेवक खलील खाटीक,शहर अध्यक्ष शरद पाटील,महिला आघाडी जिल्हा कार्यध्यक्ष दिपाजली गावीत,महिला आघाडी शहर अध्यक्ष सरलाताई वळवी,महेश वळवी,अनिल वसावे,धिरसिंग वळवी,जुनेद शेख,रायला गावीत,कमर शेख आदीनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा विरोधात घोषणाबाजी करत निषेध करुन राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे का निजाम पाडवी,योगेश थोरात,पंकज सुर्यवंशी,विनोद पराडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला.








