नंदुरबार l
महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन व धुळे जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आलेली ४९ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनियर्स आणि कॅडेट ज्युदो स्पर्धेत येथील ६३ किलो वजन गटात हितेशी कमल परदेशी हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तर ९० किलो वरील वजन गटात रुद्राक्ष नरेंद्र जव्हेरी याने कास्यपदक मिळवून नंदुरबार जिल्ह्याचे नाव लौकीक केले.
सुवर्ण पदक विजेता हितेशी परदेशी हिला क्रीडा प्रबोधनी तसेच पुणे बालेवाडी येथील ज्युदो खेळातील तज्ञ प्रशिक्षिका सौ.मधुश्री देसाई व सौ.दिपाली साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी स्पर्धकांना महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे अध्यक्ष ऍड.धनंजय भोसले, जनरल सेक्रेटरी शैलेश टिळक, टेक्निकल सचिव दत्ता आफळे, सतिश पहाडे, रवी मेटकर, रवी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नंदुरबार जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव संतोष मराठे, अध्यक्ष गणेश मराठे, धुळे जिल्हा सचिव दिनेश बागुल, संदीप बाविस्कर, पवन बिराडे, प्रशिक्षिका दिपीका रामोळे आदी उपस्थित होते.