नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील आसाणे, रनाळे, शनिमांडळ, मंडळात महसूल स्थिती जाहीर करून ५० टक्केपेक्षा कमी आनवारी लावण्यात यावी व पूर्व भाग दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नागरीकांनी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या पावसाळयात आसाणे गावासह रनाळे, व शनिमांडळ महसूल मंडळात सरासरी पेक्षा कमी व ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाची स्थिती जेमतेम राहिली रब्बी तर येणे शक्यच नाही. या परिसरातील सर्वच लहान मोठे सिंचन प्रकल्प बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत व नदी, नाले कोरडे आहेत. या स्थितीला कंटाळून परिसरातून ४ ते ५ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. तरी दुष्काळ कोरडा असतांना प्रशासनाने या गावांची घरमास्थळी चौकशी न करता पिक आणेनवारी ५० टक्केपेक्षा जास्त लावली आहे.
त्यामुळे आम्हाला दुष्काळी स्थितीचा लाभ ही मिळणे अवघड आहे. त्यामुळे आणनेवावरी चौकशी करून ५० टक्केपेक्षा कमी आनेवारी लावण्यात यावी व पूर्व भाग दुष्कळी जाहीर करावा. दुष्काळी योजनांचा सर्व लाभ सदर मंडळातील शेतकर्यांनी व्हावा असे निवेदनात म्हटले आहे. न मिळाल्यास शेतकर्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही यास शासन, महसूल प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनावर भरत पंडीत पाटील, समाधान किसन पाटील, रविंद्र कांचन पाटील, योगेश पाटील, गंभीर पाटील, अरूण पाटील, बाबु पाटील, बन्सीलाल पाटील, आत्माराम पाटील, रतिलाल पाटील, रोहिदास पाटील, अशोक भिल, ताराचंद पाटील, रामचंद पाटील, गणेश पाटील, हरचंद श्रावण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जगन भिल, राजधर पाटील, खंडू अहिरे, प्रकाश पाटील, किसन पाटील, विठ्ठल ठेलारी, डिगंबर पाटील, भिला धानोरे, लोटन पाटील, काशिनाथ पाटील, ईश्वर पाटील, माधव पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.