नंदुरबार l
अक्लकुवा येथे मागील दाखल केसच्या भांडणाची कुरापत काढून दोघांना लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथे मागील दाखल केसच्या भांडणाची कुरापत काढून सलीमखान दाऊदखान कुरेशी यांना जुनेद सईद कुरेशी, नबील सलीम कुरेशी, सईद इब्राहीम कुरेशी या तिघांनी पकडून ठेवले. तर जुबेर सईद कुरेशी याने सलीमखान कुरेशी यांना लोखंडी सळईने डोक्यावर मारुन दुखापत केली व अल्ताफ इब्राहीम कुरेशी याने हाताबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी सलीमखान कुरेशी यांचे मोठे भाऊ गफ्फारखान दाऊदखान कुरेशी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही जुबेर सईद कुरेशी याने सळई डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सलीमखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील करीत आहेत.








