नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार मर्चंट कॉपरेटिव्ह बँकतर्फे अमृत सिद्धी योजनेअंतर्गत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा वयाची 75 वय वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांसाठी 1100 रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले आहे.
सभासदांसाठी आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली असून बँकेचे संस्थापक चेअरमन किशोरभाई वाणी यांच्या हस्ते योजनेतील लाभार्थी सभासदांना धनादेश वितरित करण्यात आले. दि नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे सभासदांच्या बँक हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार 75 वय वर्ष पूर्ण केलेलया ज्येष्ठ सभासदांनाअमृत सिद्धी योजनाअंतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आले.
यात कमलाकर वाणी, मंगलगीर गोसावी, रामकृष्ण मराठे, पितांबर सरोदे, डॉ.फैजी होरा, तुकाराम विठ्ठल चौधरी, सुरजमल तोष्णीवाल यांना आदेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन किशोर वाणी, व्हाईस चेअरमन बळवंत जाधव, संचालक सुरेश जैन, प्रमोद पाटील, मच्छिंद्र मगरे, कृष्णा गांधी, राजेंद्र जैन, दिलीप शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. टी. पाटील उपस्थित होते.
नंदुरबार मर्चंट बँकेतर्फे सभासदांसाठी कन्या जन्मोत्सव योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलास मुलगी जन्माला आल्यास बँकेकडून त्या मुलीच्या नावे एक हजार शंभर रुपयाची ठेव पावती देण्यात येईल. हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी सभासदांना फक्त एकदाच 11 हजार रुपयाची मदत करण्यात येईल. या योजनेचा लाभ सभासद आणि पती-पत्नी यांना घेता येईल .डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सभासदांना तीन हजार शंभर रुपये देण्यात येणार आहे. तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कुटुंब नियोजनाचे महत्त्व लक्षात घेऊन सभासद व त्यांचे पती पत्नी यास आपल्या पसंतीच्या डॉक्टरांकडून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी बँकेतर्फे दोन हजार शंभर रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात येईल.
बहिरेपण निर्मूलन शस्त्रक्रियेसाठी सभासद आणि त्याच्या पति पत्नी यांना तीन हजार शंभर रुपयाचे अर्थसहाय्य देण्याचे नियोजन आहे. किडनी डायलिसिस करिता बँकेतर्फे सभासदास एकदाच 11 हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. गुडघे शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक सभासदास दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येईल. या सर्व योजनांचा लाभ फक्त एकदाच मिळणार आहे.मर्चंट बँकेच्या विविध सेवाभावी योजनेबद्दल उपस्थित जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








