Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी 8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

team by team
November 4, 2022
in शैक्षणिक
0
नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी  8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड
नंदुरबार  l
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे होणार आहे.
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी 150 जागांसाठी लक्षांक प्राप्त झाला असून प्राप्त लक्षांकापैकी 65 लाभार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट निवड होणार असून उर्वरित 85 जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. यात धडगाव तालुक्यासाठी 34, अक्कलकुवा 31 तर तळोदा तालुक्यासाठी 20 विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येईल. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान आपले आदेश कार्यालयातून घेवून जावून ज्या शाळेत विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या शाळेत प्रवेश घ्यावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा बदलून मिळणार नाही. यावर्षी इयत्ता दुसरीच्या प्रवेशासाठी लक्षांक अप्राप्त असल्याने निवड प्रक्रिया होणार नाही.
तालुकानिहाय ईश्वरचिठ्ठी निवड प्रक्रीयेची वेळ तळोदा तालुक्यासाठी सकाळी 11 ते 12-00 वाजता, अक्कलकुवा दुपारी 12 ते 1-00 तर धडगांव तालुक्यासाठी दुपारी 1 ते 2-00 वाजेदरम्यान राहील. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणार नाही त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रवेशासंबंधी कार्यवाही करावी. निवड प्रक्रियेबाबत सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांनी राहील. असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीस मुदतवाढ

Next Post

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकाला लाच प्रकरणी एक वर्ष कैदेची शिक्षा

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add