खेतीया l प्रतिनिधी
शहादा येथे सन 2022-23 या गाळप हंगामासाठी श्री नागाई देवी शुगर प्रा.लि. नंदुरबार यांचे पुरुषोत्तम नगर साईटवरील कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी व सौ. वंदना रविंद्र चौधरी तसेच मा. आमदार शिरीष चौधरी व सौ. अनिता शिरीष चौधरी यांच्या हस्ते व श्री. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
श्री नागाई देवी शुगर प्रा. लि. पुरुषोत्तमनगरचा तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, शहादा तालुका मार्केट कमिटीचे व्हा. चेअरमन रविंद्र रावल, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेचे चेअरमन व लोणखेडा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील, अण्णासाहेब पी. के. पाटील पतसंस्थेचे चेअरमन सुनिल पाटील, सातपुडा कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, ख.वि. चे व्हा. चेअरमन जगदिश पाटील, उद्धव पाटील, जयप्रकाश पाटील, सातपुडा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळेस माहीती देतांना डॉ. रविंद्र चौधरी म्हणाले की, कारखाना 15 नोव्हेंबर पर्यंत सुरू करण्याचे नियोजन केले असून कारखान्याचा कार्यक्षेत्रातील सभासदांनी 24,500 एकर उसाची नोंदणी केली आहे. त्यामुळे 8 लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून, या हंगामात कारखान्याचे नुतनीकरण करून दैनंदिन 5500 मे. टन पर्यंत गाळप क्षमता असणार आहे. नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांचा हक्काचा आणि विश्वासाचा कारखाना म्हणून श्री.नागाई देवी शुगर प्रा.लि. कडून गुंतवणूक करून चालविण्यासाठी घेण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील नोंद व बिगर नोंद असा सर्व ऊस गाळपासाठी घेतला जाईल. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असे आवाहन सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व श्री नागाई देवी शुगरचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी केले.
गळीत हंगाम सन 2022-23 साठी गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ऊसतोड मजूर, हार्वेस्टर तसेच ऊस वाहतुकीसाठी लागणारी यंत्रणा सज्ज केलेली आहे. ऊस तोडणी कार्यक्रम नूसार गट कार्यालय मार्फत पाणी तोड नोटीस मिळाल्या शिवाय ऊस क्षेत्रास पाणी देणे बंद करु नये.