नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व शिक्षण विभागात विविध पदाच्या तब्बल 495 जागा रिक्त आहेत.नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालत रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.त्याला उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 422 तर शिक्षण विभागात 53 जागा रिक्त आहेत.त्यामुळे त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.त्याच बरोबर शैक्षणिक कामकाजावर ही परिणाम होत आहे.नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व शिक्षण विभागात विविध पदाच्या तब्बल 495 जागा रिक्त आहेत.नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालत रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याला उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा डॉ.हिना गावित जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक,जि.प.सदस्य भरत गावित उपस्थित होते.