शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि.31 ऑक्टोबर रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले.
एकता दौड नंतर राष्ट्रीय एकता अबाधित राहावी यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर, प्रा.आय. जे .पाटील, प्रा. एस.के.तायडे, प्रा.आर.झेड.सय्यद, डॉ. यु.एम.जाधव आदि प्राध्यापकांनी रासेयो स्वयंसेवकांसोबत एकता प्रतिज्ञा घेऊन सहभाग घेतला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, डॉ. वजीह अशहर, डॉ. वर्षा चौधरी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.