तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुहास नाईक यांचा पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष यांच्या सत्काराच्या कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आला यावेळी सुहास नाईक यांनी जिल्हा परिषद मध्ये त्यांनी घेतलेले भूमिकेबद्दल आलेल्या पदाधिकारी व काँग्रेसच्या सदस्यांशी चर्चा केली व सविस्तर माहिती देऊन सत्काराचे उत्तर दिले यावेळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी केले होते.
तालुक्यातून काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रवीण वळवी, दिवाकर पवार, प्रताप पाडवी, रोहिदास पाडवी, भावजी पाडवी, राजकुमार पाडवी, दिपक मोरे, किरण वसावे, सरवरसिंग वसावे, गोविंद पाडवी, सुभाष राऊत आदी उपस्थित होते.