नंदुरबार l
नंदुरबार नगरपालिकेने शहरात अनेक राष्ट्र पुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले आहेत. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणांची बलिदान देऊन देव, देश, धर्म जीवंत ठेवला अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नंदुरबार शहरात व्हावा त्यासाठी शासकीय जागा आणि निधी मंजूर करावा या आशयाचे स्वरक्ताने लिहलेले निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना समक्ष भेटून दिले यावेळी राजू चौधरी, जितेंद्र राजपूत, जयेश भोई उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी धर्मनिष्ठा आणि स्वराजनिष्ठा सोडली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र संपूर्ण विश्वासाठी आदर्श आहे. जिल्हातील नागरिकांना छ. संभाजीराजे आदर्श जीवनचरित्रातुन आदर्श नागरिक घडावे यासाठी नंदुरबार शहरात छ. संभाजीराजे यांचे पुतळा होणे आवश्यक आहे. पुतळ्याचा अवतीभोवती छ. संभाजीराजे यांचा जीवन चरित्रविषयी शिल्प निर्माण करावे व स्मारकाचा अग्रस्थानी छ संभाजीराजे यांची राजमुद्रा लावावी अशी तमाम श्रीशिवशंभू भक्तांची इच्छा आहे. यासाठी छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासकीय जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनात हिंदु सेवा सहाय्य समितीने केली आहे.








