नंदुरबार l
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन घेण्याबाबतची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून सदरची लिंक नंदुरबार जिल्ह्याच्या https://nandurbar.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
ज्या पदवीधरांना 1 नोव्हेंबर, 2022 पुर्वी पदवी प्राप्त करुन किमान तीन वर्ष पुर्ण झाली आहेत, अशा पदवीधारकांनी त्यांचा सर्वसाधारण रहिवास असलेल्या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविता येईल. पदवीधर मतदारसंघासाठी दि. 1ऑक्टोबर, 2022 ते 7 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत मतदार नोंदणी सुरु असल्याने मतदार नोंदणीसाठी विहीत नमुना क्र. 18 असून त्यानुसार अर्ज ऑलाईन भरण्याबाबतची सुविधा आता उपलब्ध आहे. तरी पात्र पदवीधरांनी ऑनलाईन अर्ज भरतांना पुढीलप्रमाणे सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
अर्जासोबत अपलोड करण्यात आलेला रहिवासासाठीचा पुरावा स्वयंसाक्षांकित असणे आवश्यक आहे., अर्जासोबत जोडलेले शैक्षणिक अर्हतेबाबतचे कागदपत्र उदा. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका इत्यादि संबंधित पदनिर्देशित अधिकारी/सहायक पदनिर्देशित अधिकारी/जिह्यातील राजपत्रित अधिकारी/ नोटरी यांच्याकडून प्रमाणित करून अपलोड करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.








