नंदुरबार l
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी श्रीमती. खत्री यांनी दक्षता सप्ताहा निमित्त संदेशाचे वाचन करुन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बांगडे, कल्पना निळ-ठुबे, तहसीलदार उल्हास देवरे, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








