Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे राष्ट्रीय एकता दौड उत्साहात, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकात्मितेची शपथ

team by team
October 31, 2022
in राष्ट्रीय
0
नंदुरबार येथे राष्ट्रीय एकता दौड उत्साहात, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकात्मितेची शपथ

नंदुरबार l प्रतिनिधी

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,जिल्हा पोलीस दल, नगरपरिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच भामरे क्लासेस व आबाजी स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यानंतर त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देवून मान्यवराच्या हस्ते राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून प्रांरभ करण्यात आला. ही रॅली नगरपालिकेच्या हुतात्मा उद्यानापासून सुरुवात होऊन जुनी नगर पालिका चौक, अंधारे चौक मार्गे छत्रपती शिवाजी नाटयमंदीर येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीच्या माध्यमातून ‘आम्ही सर्व एक’ असल्याचा संदेश देण्यात आला.

रॅलीत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतिष चौधरी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, शिव छत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, टेनिक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, भामरे क्लासेसचे संचालक युवराज भामरे, तसेच विद्यार्थी, खेळाडू,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

एकता दौड यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मुकेश बारी, महेंद्र काटे व कविता राठोड तसेच आबाजी स्पोर्टसचे जगदिश वंजारी, मनिष सनेर, अमोल चित्ते, गोपाल चव्हाण, योगेश माळी, प्रदिप माळी, राकेश चौधरी, गीता निकम यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक प्रा. मयुर ठाकरे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

महिलेस जिवेठार मारण्याची धमकी प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

महिलेस जिवेठार मारण्याची धमकी प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add