नंदुरबार l
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या सार्वजनिक जागेत पॅन्टच्या खिशातून पाकीट व मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मंगळ बाजार येथील गणेश सदाशिव मराठे हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या सार्वजनिक जागी उभे असतांना सचिन कैलास मराठे (रा.ममुराबाद, जळगाव, ह.मु. संजय नगर झिरी उधना सुरत) याने गणेश मराठे यांच्या पॅन्टच्या मागील खिशातील काळ्या रंगाचे पाकीट व त्यातील ४ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.
याबाबत गणेश मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सचिन मराठे याच्याविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भटू धनगर करीत आहेत.








