गांधीनगर |
गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते. या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजन पडलं आहे.पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी आहे.








