नंदुरबार l
शहरातील रज्जाक पार्क येथे चिडविण्याच्या कारणावरुन दोन गटात शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी परस्पर फिर्यादीतून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहराील रज्जाक पार्क येथील अनस फिरोज कुरेशी अनस फिरोज कुरेशी यांनी बाबा विडी चिडविण्याच्या कारणावरुन सिद्दीक अस्लम खान पठाण, जुनेद अस्लम खान पठाण, सरजिल खान फरीद पठाण, शोएब शेख पठाण, मोईन खान जाविद खान, फरिद खान अजिज खान पठाण, अस्लम खान अजिन खान पठाण, बबलू ड्रायव्हर, फैजल खान फरीद खान पठाण, जमिर अजिज पठाण यांच्यासह ८ ते १० जणांनी गर्दी करुन लाठ्या, काडठ्या, घेवून मारहार करुन दुखापत केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठा मारण्याची धमकी दिली व जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन हातात फायटर घेवून धमकाविले. याबाबत अनस फिरोज कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात २० जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सादिक शेख करीत आहेत.
तर जुबेना फरीद खान पठाण यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाबा विडी चिडविण्याच्या कारणावरुन फिरोज जहीर कुरेशी, राजू जहीर कुरेशी, अनस फिरोज कुरेशी, सलिम कुरेशी व अवेश नायब कुरेशी यांनी लाठ्याकाठ्या घेवून मारहाण करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत जुबेदा फरीद खान यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेहेकॉ.प्रकाश अहिरे करीत आहेत.








