नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाल्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने भव्य बँड च्या तालावर कार्यकर्त्यांनी गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांची कुलदैवत याहामोगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.

शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली मात्र याच निवडणुकीनंतर रात्रीतून राज्यातील राजकीय वातावरण बदलले आणि सत्ता पालटली. त्यामुळे आमदारकीच्या आनंदावर विरजण पडले परिणामी कार्यकर्त्यांना आमदार आमश्या पाडवी यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचे आवाहन केले होते.
अक्कलकुवा तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही सदस्यांना सभापती पद मिळाले त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह संचारला.

त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदुरबार धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे सभापती गणेशदादा पराडके, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, युवा सेना जिल्हा अधिकारी ललित जाट यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर नाचत वाजत गाजत आदिवासी बांधवांचे कुलदैवत देवी याहा मोगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती.








