नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यानिमित्त रविवारी लोकनेते माणिकराव गावित सभागृहात सर्व धर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मगुरूंनी पालिकेच्या वैभव आणि विकासासाठी प्रार्थना केले.
नंदुरबार नगरपरिषदेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाल्यानंतर काल रविवारी सायंकाळी लोकनेते माणिकराव गावित सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले.
यावेळी हिंदू धर्माकडून राजेंद्र पाठक यांनी वेद मंत्रोच्चार, मुस्लिम धर्माकडून मौलाना हुजेफा नजराबादी यांनी आयतल कुर्सी, ख्रिश्चन धर्माकडून रेव्ह.अनुप वळवी यांनी शांती ऐक्य प्रार्थना, बौद्ध धर्माकडून भंते धर्मरक्षित थेरो यांनी संघ प्रार्थना,शीख धर्माचे ग्यानी रणजित सिंग यांनी गुरुनानकांची हरदासी पठण केली.








