नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रोजी नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी नंदूरबार येथे दाखल झाले आहेत.मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली
असुन ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.
नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी भली मोठी पत्रिका छापण्यात आली आहे.अनेक मान्यवरांची नावे आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक,
हे आज रोजी नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी नंदूरबार येथे दाखल झाले आहेत.मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली
असुन ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला आलेच नाहीत.








