नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांच्या प्रतीक संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनावर निशाणा साधून आपले शेतकऱ्यांसाठी असलेले कार्य सुरू आहे. असे सांगत विरोध करून शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या शरद पवार यांचा भारतीय किसान सेना तर्फे निषेध करण्यात आला.
याबाबत सुरेश जगदेव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेऊन विरोध केला आहे. भूविकास बँकेच्या 34 हजार 788 थकीत कर्जदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनावर निशाणा साधून आपले शेतकऱ्यांसाठी असलेले कार्य सुरू आहे. असे सांगत असे सांगत विरोध करून शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या शरद पवार यांचा भारतीय किसान सेना तर्फे निषेध करण्यात आला. भारतीय किसान सेना सेक्युलर चे राज्य प्रदेश संघटक सुरेश जगदेव यांनी पत्रकात म्हटले आहे.








