नंदुरबार l प्रतिनिधी
सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने बळीराजा दिवस साजरा.
सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार येथील दुधाळे येथे कृषी सम्राट बळीराजा दिवस साजरा करण्यात आला.

हा दिवस म्हणजे बळीराजाचा गौरव दिन, महाभारतामध्ये बळीराजाला वामनाने पाताळात का घातलं यासाठी प्रश्न विचारण्यात यावा. कारण बळीराजा दानशूर व कष्टाळू होता. समन्यायी वाटप करण्याचे धोरण होतं. तरी बळीराजाचा अंत करण्यात आला. बळीराजाची आठवण म्हणून हा दिवस सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो येथे. नंदुरबार येथील दुधाळे शिवारात येथे प्रारंभी कृषी सम्राट बळीराजा गौरव मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बळीराजाच्या हस्ते पूजा करून पाच शेतकऱ्यांना प्रसाद स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले
.यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे सचिव विक्रम गावित यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की बळीराजा हा बहुजन समाजाचा श्रेष्ठ पूर्वज होता बळीराजांनी सिंधू संस्कृतीचे जतन संवर्धन केले शेतीचा शोध लावणारा श्री सत्तेचा इतिहासाला जागे ठेवले प्रत्येक क्षण करणाऱ्या माणसाला बळीराजाचे प्रतिष्ठान होती तो समतेने आणि ममतेने वागण्याबद्दल प्रसिद्ध होता तसेच बळीराजा किती दानशूर होता याचे महत्व सांगितले.या कार्यक्रमाला जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती . यावेळी इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असा जयघोष करण्यात आला. यावेळी लिलाताई वळवी ,जमुनाबाई ठाकरे मनोहर वळवी ,रविदास वळवी चिंतामण पाडवी आदी उपस्थित होते.








