नंदुरबार l
शहरातील श्रीराम नगर व खोडाई माता मंदिराजवळून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील निलेश माधवराव कुलकर्णी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए ३५९२) श्रीराम नगरातील त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली.
तसेच जयेश काशिना चौधरी यांंच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एल ७२२७) खोडाई माता मंदिराजवळील राज्य सरकारी वखार महामंडळाच्या गेटजवळून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत नंदुरबार उपनगर व शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








