नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावभा ऋषींच्या यात्रोत्सवास सुरूवात झाली असुन खांन्देशातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.गेल्या दोन वर्षांपासुन बंद असलेल्या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थीती लावली होती.

खांन्देशातील प्रसिध्द असलेल्या यात्रामध्ये नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावभा ऋषींच्या यात्रोत्सवाचा समावेश आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासुन यात्रेस खंड पडला होता.मात्र यंदा मोठ्या उत्साहात यात्रोत्सव भरला.या बाबत एक अख्यायीका आहे.

त्यामुळे भाविक व सेवेकरी यात्रेत सहभागी होऊ लागले.हळुहळु यात्रेचे स्वरूप मोठे होत गेले. पावभा ऋषीच्या सेवेकरी रात्रभर जागून पावभा ऋषीच्या जीवनपटावर ओव्या गाऊन ओव्या रूपात गाऊन डांख्याच्या व वाजंत्रीच्या तालावर मंदिर परिसरात नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्यातील पावभा ऋषीचे सेवेकरी आपल्या सहकार्यांसमवेत रातभर जागरण करतात,ज्याभाविकेची इच्छा पूर्ण झाली तेही कुटुंबासमवेत थांबतात येथून दुसर्या दिवशी सर्व सेवा करी भावी भक्त पावभाच्या दर्शनासाठी अक्राळे गावाकडे निघतात,येथे नवस्फूर्ती करतात .

नाशिंदे येथे १९९२ च्या जवळपास मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. १९९९ साली डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधीतून सभामंडप बांधण्यात आले.येथील श्री पावभा व राजबाई संस्था संस्था नाशिंदा यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या परिसरातील भाविकांसाठी विविध सोय उपलब्ध करून दिले आहेत असे माहिती श्री.पावभा ऋषी राजबाई संस्थान नाशिंद्यांचे अध्यक्ष छबिलाल पाटील व उपाध्यक्ष व्यंकट पाटील यांनी दिली. यात्रेत लहान मोठे पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाणे, नारळ, प्रसादाची दुकाने यात्रेत दाखल झाली आहेत. यावर्षी तिथीत वाढ असल्याने दोन दिवसापर्यंत नवस फेडले जात आहेत.हजारो भाविकांची उपस्थीतीत होते. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शन घेत नवास फेडले.

पावभा ऋषींबाबत अशी अख्यायीका आहे प्रसिध्द
पावभा ऋषी काठोबा देवाचे भक्त होते.पावभा ऋषीचे मुळगाव नामपुर मोराणे ता.सटाणा तर मामाचे गाव धमणार ता.साक्री व सावत्र मामाचे गाव डांगुर्णे ता.शिंदखेडा,सावत्र मामा पावभा ऋषींना डांगुर्ण येथे घेऊन गेले. त्यानंतर पावभांनी बारा वर्षाच्या वयापासून भक्ती सुरू केली. पावभा ऋषींनी बारा,बारा वर्षाचे तीन तप केले.या तपात्या जोरावर इंद्राचे आसन डोलामान झाले. तपास तीन दिवस शिल्लक असताना नारदाने पावभा ऋषींची पत्नी मोहिनी यांना सांगीतले कि, पावभा ऋषीचे तप पूर्ण झाले आहे.तर तुम्हाला मढीत जायला काही हरकत नाही.

त्यांच्या सांगण्याप्रमाणे पत्नीने मढीत प्रवेश केला श्री च्या पैंजणाचे आवाजाने पावभा ऋषींचे तप खंडित झाले.वैराग्यात पावभा ऋषी खापरखेडा ता.नंदुरबार येथील पोलीस पाटील मित्र गहिबू पाटील यांच्याकडे निघाले.येतांना रात्र झाली.खापरखेडा येथे पोहोचल्यावर त्यांनी यांच्या घराचा दरवाजा ठोकला आवाज दिला मात्र घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने रागात त्यांनी शाप दिला. खापरखेडा गाव उजाड होईल. त्यांनी शाप देऊन तापी काठावरील विश्वतीर्थावर येऊन तापी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली.
पावभा ची बहिण आराळे ता.शिंदखेडा येथे दिली होती. रात्री बहिणीच्या स्वप्नात जाऊन मी जलसमाधी घेतली असे स्वप्नात सांगितले, बहीण राजबाई या सकाळी डांगुर्णे गावाकडे निघाली डांगुर्णे येथे पोहोचून मढीत भावाला शोधू लागले लागली. भाऊ नसल्याने विचारणा केली भाऊ वैराग्यात निघून गेला अशी माहिती मिळाल्याने भाऊ कुठे गेला असेल असा विचार करू लागली, बहिणीच्या लक्षात आले की,भावाचा एक मित्र खापरखेडा येथे राहतो त्याच्याकडे गेला असेल त्यामुळे भावाचा तपास करण्यासाठी खापरखेडा गावाकडे निघाली तेथील भीवल्या कोळी नंदुरबार येथील जेलमध्ये होता.
त्याच्या स्वप्नात जाऊन पावभा ऋषींनी सांगीतले कि,मी जलसमाधी घेतली आहे व माझे प्रेत नाशिंदे गावाच्या काठावर आले आहे. सकाळी भीवल्या कोळी यांनी ब्रिटिश पोलीस अधिकार्यांना स्वप्नातील घटना सांगितली व मला खापरखेडा येथे जाऊ द्या म्हणून विनंती केली. मात्र भीवल्या कोळी हा पळून जाईल अशी पोलिसांना भीती वाटत असल्याने, पोलीस फौज फाटा व भिवल्या कोळी खापरखेडा येथे पोहोचले. भिवल्या कोळी नदीपात्रात उतरल्यावर काही अंतरावरच त्यांना पावभा ऋषींचा देह सापडला त्यांनी तो बाहेर काढला तोपर्यंत राजबाई ही परिसरात तपास करत असतांना गर्दी पाहून तापी नदीकडे निघाली. नदी काठावरच भावाने येथेच जलसमाधी घेतली याची खात्री पटली.
भीवल्या कोळीने देह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर राज बाईच्या मांडीवर दिला बहिणीने भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन तापी नदीचे जलसमाधी घेतली. तेथून ं दोघांच्या प्रेत नाशिंदे येथे आणण्यात आले. तेथेच लहान मंदिर बांधण्यात आले असल्याची आख्यायिका प्रमाणे साडेचारशे पेक्षा जास्त वर्षे झाल्याची माहिती पावभा ऋषीचे सेवेकरी भगत रामदास दंगल धनगर रा.अंबाडे, ता.चोपडा यांनी सांगितले तेव्हापासून येथे अश्विनी शुद्ध चौदस रोजी यात्रा भरण्यास सुरुवात झाली.








