नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील १७ वर्षीय युवक अस्तंभा शिखरावर दर्शनासाठी पायी गेला होता. परत शिखरावरुन उतरत असतांना बाटेत मामा भाचा टेकडीवरून पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार शहरातील लहाण माळीवाडा भिलाटी येथे राहणारा गणेश सुरेश वळवी ( १७ वर्षे ) हा अस्तंभा यात्रे निमित्ताने धडगाव तालुक्यातील अस्तंभा गावी अस्तंभा शिखरावर दर्शनासाठी पायी गेला होता.दर्शन घेऊन परत शिखरावरुन उतरत असतांना बाटेत त्यांचा मामा भाचा टेकडीवरून पाय घसरल्याने गणेश वळवी हा दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्याचे प्रेत खोल दरीत असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला २३ ऑक्टोंबर सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी ईश्वर रुपसिंग वळवी वय २८ वर्षे, धंदा मजुरी रा. लहाण माळीवाडा भिलाटी, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई राहुल पाटील करीत आहेत.








