नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील भामरमाळ येथे मोठ्याने दुचाकी हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून काठीने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील खर्डीबर्डी येथील सुकलाल शांतू गावित यांनी गांजो उर्फ जयसिंग सुमन गावित याला मोठ्याने दुचाकीचा हॉर्न का वाजवितो याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने गांजो उर्फ जयसिंग गावित याने शिवीगाळ करीत काठीने सुकलाल गावित यांना मारहाण करुन दुखापत केली.
याबाबत सुकलाल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात गांजो उर्फ जयसिंग गावित याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.








