Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन: अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी

team by team
October 24, 2022
in सामाजिक
0
खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन: अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी
तळोदा l प्रतिनिधी
 तळोदा पोलिसांनी दिवाळीत येथील अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून व गांवाबाहेरील माळरानावर वस्ती करून राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवुन खाकी वर्दीतील माणसाचे दर्शन घडविले आहे.
 पोलीस अधीक्षक पी .आर .पाटील यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात   तळोदा पो स्टे चे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दावलशा बाबा महिला उन्नती मंडळ संचलित अनाथ मुला मुलींचे बालगृह येथील 38 मुलांना नवीन कपडे  तसेच गावाबाहेरील माळरानावर उद्योग व्यवसायानिमित्त वस्ती करून राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील 40 मुलांना फराळाचे पॅकेट उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या हस्ते वाटप केले.
यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला होता. दिवाळीच्या निमत्ताने  प्रत्येक जन आपल्या कुटुंबातील मुलांना नव-नवीन कपडे, खाऊ आणण्याच्या तयारीत असतो.अनाथ आश्रमात राहणारी मुलांना नवीन कपडे घेऊन द्यायला कुटुंबच नसते  व  कमी उत्पन्न गटातील व गावाबाहेरील माळरानावर वस्ती करून  राहणारी बरीच भटकी कुटुंबे अशी आहेत की, दिवाळीत आपल्या मुलांना नवीन कपडेच काय तर घरात दिवाळी फराळ देखील करू शकत नाहीत.
अश्या सर्व वंचित व निराधारांची दिवाळी सुद्धा नवीन कपड्यांनी व फराळाने साजरी व्हावी ही  संकल्पना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आपल्या पोलीस दलाच्या सहकार्याने प्रत्यक्षात आणली या साठी तळोदा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे पोलीस कर्मचारी पो ना अजय कोळी पो कॉ अनिल पाडवी, हे कॉ देविदास वाडीले, पो कॉ रघुवीर रामोळे, होमगार्ड राजेंद्र मगरे यांनी परिश्रम घेतले
बातमी शेअर करा
Previous Post

मोरवड येथे आज आरती पूजन व मिरवणूक

Next Post

नाशिंदा येथे आज श्री पावभा ऋषीचा यात्रोत्सव

Next Post
नाशिंदा येथे आज श्री पावभा ऋषीचा यात्रोत्सव

नाशिंदा येथे आज श्री पावभा ऋषीचा यात्रोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add