Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोरवड येथे आज आरती पूजन व मिरवणूक

team by team
October 24, 2022
in सामाजिक
0
मोरवड येथे आज आरती पूजन व मिरवणूक
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोरवड येथे गेल्या ८५ वर्षापासून सुरू असलेला अखंड दिवाळी आरती पूजन व मिरवणूक कार्यक्रम सोमवार रोजी रंजनपुर येथे आप मूळ धर्म आप श्री. सती पती आरती पूजक आप समाज मार्फत व संत गुलाब महाराज यांचे वंशज जितेंद्र पाडवी यांनी आयोजित केला आहे. या आरती पूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत गुलाम बाबा यांचे वंशज जितेंद्र पाडवी यांनी केले आहे.
   स्वातंत्र्य पूर्व काळापासून म्हणजे १९३७ साली आप मूळ धर्माची स्थापना महाशिवरात्रीच्या दिवशी झाली.तेव्हापासून अखंड अशी दिवाळीच्या दिवशी आरती पूजन रंजनपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.वर्षातून चार वेळा आरती पूजन व मिरवणूक मोठ्या प्रमाणावर रंजनपूर येथे होत असते.
   त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी रामदास महाराज शांत झाले होते म्हणून शांती दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. त्यानंतर आषाढ वैद्य सप्तमीच्या दिवशी गुलाम महाराज शांत झाले होते म्हणून त्या दिवशी शांत दिवस म्हणून साजरा केला जातो व दिवाळीच्या दिवशी अति उत्साह दिवस म्हणून साजरा केला जातो.
    या दिवशी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक संत येत असतात रात्री आठ वाजता रामदास महाराजांच्या घरापासून रामदास महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघत असते.
प्रत्येक घरातील महिला ह्या आपल्या हातात ताटावर आरती घेऊन मिरवणुकीत सहभाग घेत असतात ही मिरवणूक गुलाम महाराज यांच्या घराच्या मार्गातून जात असते.त्यांच्या घरातून गुलाम महाराज यांच्या प्रतिमा घेऊन मिरवणूक निघते व रात्री बारा वाजता समाधीस्थळी येत असते. तेथे आरती पूजन होते व प्रवचन होते गुलाम महाराज व रामदास महाराज यांची शिकवण भाविकांना सांगितली जाते नंतर महाप्रसाद दिला जातो. व मिरवणुकीची समाप्ती होत असते गुलाम महाराज व रामदास महाराज यांनी घालून दिलेली ही परंपरा ८५ वर्षापासून अखंड अशी गुलाम महाराजांचे वंशज व रामदास महाराजांचे वंशज संत चंद्रसेन बाबा, व संत जितेंद्र पाडवी यांनी चालू ठेवली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतरीतांचे मॅपिंग होणार: खा.हीना गावित

Next Post

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन: अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी

Next Post
खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन: अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन: अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add