नंदुरबार l
शहरातील मिराज सिनेमामागे ऊसनवार पैशांच्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील तेलीवाडा येथील संदिप सुदाम चौधरी यांनी मंगला गणपत चौधरी यांच्याकडून दोन वर्षापूर्वी दोन लाख रुपये घेतले होते. सदर ऊसनवार पैशांच्या वादातून संदिप चौधरी यांना मंगला गणपत चौधरी, योगेश उर्फ मोंटू गणपत चौधरी, भूषण गणपत चौधरी, विक्की उर्फ बालाजी गणपत चौधरी, रविंद्र छबुलाल चौधरी यांनी मारहाण केली.
तसेच खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. याबाबत संदिप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.इसमल पावरा करीत आहेत.








