Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा न्यायाधीश आर.जी मलशेट्टी यांच्या हस्ते बाल न्यायमंडळ कार्यालयाचे उद्घाटन

team by team
October 21, 2022
in राज्य
0
जिल्हा न्यायाधीश आर.जी मलशेट्टी यांच्या हस्ते  बाल न्यायमंडळ कार्यालयाचे उद्घाटन

नंदुरबार  l

 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) मंडळाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन आज जिल्हा न्यायधीश न्या.आर.जी.मलशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले.

महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय,जिल्हा परिषद शेजारी झालेल्या या कार्यक्रमास वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश न्या. एस.टी.मलीये, मुख्य न्यायंदडाधिकारी न्या.व्ही.जी.चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव डी.व्ही.हरणे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. व्ही.एन. मोरे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या.व्ही.एन.गायकवाड, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.श्रीमती.वाय.के.राऊत, दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.एन.बी.पाटील, तिसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.ए.एस.कुळकर्णी, चौथे प्रथम वर्ग न्या.एस.डी.मोरे,

 

 

 

पाचवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.श्रीमती. प्रियंका काजळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर, श्रीमती.ज्योती कळवणकर, प्रबंधक जिल्हा न्यायालय श्री.जोशी, महिला आर्थिक विकास महामडळाचे जिल्हा वरिष्ठ समन्वयक श्रीमती. कांता मिश्रा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी जी.ए.जाधव, परिविक्षा अधिकारी व्ही.एन.लोखंडे, एस.एम.पवार, बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रशांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना न्या.श्री.मलशेट्टी म्हणाले की, बालकांच्या क्षेत्रात काम करतांना बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती, पोलीस ,आरोग्य विभाग तसेच महिला बाल विकास विभागाचा समन्वय चांगला असून येथील बाल कल्याण समितीचे काम खूप चांगले असल्याचे सांगितले. बाल कल्याण समितीचे संदर्भात नागरिकांना माहिती व्हावी यासाठी प्रसार व प्रसिद्धी करावी असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बोलतांना न्या.श्री. चव्हाण म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण ) अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार विधी संघर्षित बालके, बालिका यांचे प्रकरणे बाल न्याय मंडळामार्फत हाताळली जात असून बाल न्याय मंडळाचे कामकाज यापूर्वी श्रीयाद मुलींचे निरीक्षणगृह,जगतापवाडी, नंदुरबार येथे केले जात होते. तेथे बाल न्याय मंडळाच्या कामकाज करतांना प्रशासकीय अडचणी येत होत्या. त्यामुळे हे कार्यालय आता महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय,जिल्हा परिषद शेजारी, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे स्थलांतरीत झाल्यामुळे विधी संघर्षग्रस्त बालकांच्या हिताच्या दृष्टीने, न्यायिक विभाग,पोलीस विभाग, शासकीय रुग्णालय तसेच महिला व बाल विकास विभाग या सर्व यंत्रणाचे कार्यालय जवळ असल्याने येथील कामकाजाला अधिक गती येईल. या ठिकाणी बाल न्याय मंडळाचे कामकाज प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार आणि पहिला व तिसरा शनिवारी सुरु राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.जाधव तर आभार प्रदर्शन श्री.बिरारी यांनी केले.

यावेळी पोलीस निरीक्षक राहुल पवार,विकास गुंजाळ, प्रशांत राठोड, पो.कॉ.गिरीष पाटील, ॲड.हेमंत गागुर्डे, ॲड. शारदा पवार, ॲड. यु.एस.केदार, ॲड.अझहर पठाण, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी गौतम वाघ,गौरव पाटील, रेणूका मोघे महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

5 नोव्हेंबर रोजी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

बाल न्याय मंडळ कार्यालय स्थलांतरीत

Next Post
बाल न्याय मंडळ कार्यालय स्थलांतरीत

बाल न्याय मंडळ कार्यालय स्थलांतरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add