नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 20 ऑक्टोंबर ,2022 सकाळी 8.23 वाजता नंदुरबार रेल्वेस्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ- 6 विरल विहार,खोडाई माता रोड, नंदुरबार ).
शुक्रवार 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने प्रतापपूर ता.साक्री जि.धुळेकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता प्रतापपूर ता.साक्री जि.धुळे येथे आगमन व नागरी सत्कार सोहळा व विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय वाहनाने प्रतापपूर येथून नंदुरबारकडे प्रयाण. नंदुरबार येथे आगमन व राखीव मुक्काम. शनिवार 22 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर 2022 पर्यंत नंदुरबार येथे राखीव.








