Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आय सीड फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

team by team
October 19, 2022
in शैक्षणिक
0
आय सीड फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
तळोदा   l
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवागाव, नंदुरबार येथे ‘शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले. आय सीड फाउंडेशन, माकणी, उस्मानाबाद यांच्या कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य (3 इन 1 वही, 100 पानी वह्या, चित्रकला वही, क्रेयॉन्स खडू, पेन, पट्टी, पेन्सिल,रबर, शॉर्पनर) इत्यादी वाटप करण्यात आले. आय सीडच्या सदर उपक्रमास आदित्य आगारे व मित्रपरिवार यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभले आहे, त्याच बरोबर मशाल संस्था, पुणे यांचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी  शेखर धनगर हे होते, यावेळी आय सीड फाउंडेशनचे संचालक  विष्णू शिंदे व ज्यांच्या प्रयत्नातून शाळेस ही भेट मिळाली असे शाळेचे माजी मुख्याध्यापक अमोल सोनपेटे यांनी प्रमुख पाहुणे हे पद भूषविले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.धनगर यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना प्रेरक असे अनमोल मार्गदर्शन केले. आय सीड फाउंडेशनचे संचालक विष्णू शिंदे यांनी सर्व विद्यार्थी पालक यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये पालकांचाही सहभाग शिक्षकांइतकाच महत्वपूर्ण आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे” असे आवाहन केले. विद्यार्थ्याचा चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून ते भारावून गेले.
याच वेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक अमोल सोनपेटे यांची नुकतीच सातारा जिल्हा परिषद येथे आंतरजिल्हा बदली झाली त्यामुळे शाळा व उपस्थित व्यासपीठ यांच्या हस्ते त्यांना भेट वस्तू देवून त्यांच्या कार्याचा गौरव करून निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी श्री.सोनपेटे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या,
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अभय सराफ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष  प्रवीण ठाकरे, सदस्य, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन  अभय सराफ यांनी केले तर आभार सुनील पावरा यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती विजयालक्ष्मी पाडवी व सोनाली दळवी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून फिट इंडिया फ्रिडम रन

Next Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post
पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add