Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षकांच्या हक्कांसाठी सुरु असलेल्या लढ्याला अभूतपूर्व यश

team by team
October 19, 2022
in राज्य
0
शिक्षकांच्या हक्कांसाठी सुरु असलेल्या लढ्याला अभूतपूर्व यश
नंदूरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील शाळा व शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालपासून मुंबईच्या विधानभवनासमोर सुरू असलेल्या पदवीधर व शिक्षक आमदारांच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री  दीपक केसरकर यांनी आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व आंदोलकांना चर्चेला बोलावले. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे शिक्षक बांधवांच्या सर्व मागण्या मांडल्या. दोन दिवसांच्या  ठिय्या आंदोलनाच्या  प्रयत्नानंतर शेवटी मागण्या मान्य केल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी मंत्री महोदयांनी चर्चा करून या सर्व मागण्यांबद्दलची घोषणा केली
१५ नोव्हेंबरपर्यंत त्रुटी पात्र शाळा, सर्व अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांची पात्र यादी घोषित करणार व येणाऱ्या हिवाळी आधिवेशनात अनुदानाची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आजपर्यंत कोणतेही अनुदान नसलेल्या शिक्षक बांधवांसाठी हा खूप महत्वाचा निर्णय आहे, कारण ते सर्व आता अनुदानावर येणार आहेत. याचा सुमारे ३० हजार शिक्षकांना लाभ होणार आहे. अजूनही २०% व ४० % अनुदानावर जे शिक्षक आहेत,
त्यांना अतिशय तुटपुंजे वेतन सुरू असून प्रचलित पद्धतीनुसार त्यांना अनुदान मिळावे यासाठीही माझे प्रयत्न सातत्याने चालू राहणार आहेत. तसेच वाढीव पदांवरील शिक्षक व जुनी पेन्शन योजना या संदर्भात मा. शिक्षण मंत्री महोदयांसोबत १ नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.
या आंदोलनात नाशिक पदवीधर आमदार डॉ सूधीर तांबे  आ. बाळाराम पाटील (शिक्षक आमदार, कोकण), आ. किशोर दराडे (शिक्षक आमदार, नाशिक), आ. अ‍ॅड. अभिजित वंजारी (पदवीधर आमदार, नागपूर), आ. अ‍ॅड. किरण सरनाईक (शिक्षक आमदार, अमरावती) आ. जयंत आसगावकर (शिक्षक आमदार, पुणे) यांच्यासह आज औरंगाबादचे विधानपरिषद सदस्य मा.आ. राजेश राठोड देखील सहभागी झाले होते.
आमच्या सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे. शिक्षक बांधवांच्या हक्कांसाठी माझा हा लढा यापुढेही अविरतपणे असाच सुरु राहील अशी माहिती आमदार डॉ सूधीर तांबे यांनी दिली
बातमी शेअर करा
Previous Post

दिवाळीपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा होणार पगार

Next Post

शहादा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून फिट इंडिया फ्रिडम रन

Next Post
शहादा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून  फिट इंडिया फ्रिडम रन

शहादा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून फिट इंडिया फ्रिडम रन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add