नंदूरबार l प्रतिनिधी-
वित्त विभागाचा शासन निर्णय जारीआमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेली मागणी मंजूर केली आहे.
18 ऑक्टोबर 2022 ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचा पगार दिवाळी सणामुळे दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. वित्त विभागाने तसा शासन निर्णय जारी करत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार दिवाळीपूर्वी करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली होती. त्यानुसार वित्त विभागाने आज जीआर काढून शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा दिला आहे, असं मोरे यांनी सांगितलं आहे.
24, 25, 26 ऑक्टोबरला दिवाळी आहे. मात्र दिवाळी सण खरेदी आणि दिवे लागण, धनत्रयोदशीला म्हणजे 22 ऑक्टोबरला आहे. दिवाळी हा महाराष्ट्रातील मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शिक्षक, कर्मचारी यांचे पगार व्हावेत अशी विनंती फडणवीस यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली होती.








