नंदूरबार l प्रतिनिधी-
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग येवून एकाला घरात घुसून लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहे. तसेच संशयीतांनी घराच्या कुडाच्या कंपाऊंडची तोडफोड करीत नुकसान करुन घराला आग लावून दिली. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील अस्तंबाचा दोदमापाडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची निवडून पार पडली. या निवडणूकीत पराभूत झाल्याने गावात गैरकायद्याने मंडळी जमविण्यात आली. तसेच बैठकीतील लोकांशी संगनमत करुन धिरसिंग कोचर्या वळवी या संशयीताच्या पॅनेलमधील उमेदवार व सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. याचा राग आल्याने 12 जणांनी पोपटा गिंब्या वसावे यांच्या घरी जावून अंगणात लाठ्याकाठ्यासह लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली.
यावेळी झालेल्या मारहाणीत पोपटा वसावे यांच्यासह फोज्या हांद्या वळवी, जयसिंग रुप्या वळवी, दिनेश नोवा वळवी हे चार जण जखमी झाले. तसेच घराच्या कुडाचे कंपाऊंड, खुर्च्यासह छत्रीच्या कॅमेर्यांची तोडफोड करुन नुकसान करण्यात आली. तसेच घराला आग लावून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.
याबाबत पोपटा गिंब्या वसावे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धिरसिंग कोचर्या वळवी, हावका ओल्या वळवी, इंद्या ओल्या वळवी, दिनेश आवका वळवी, राहूल फोज्या वळवी, संदीप फोज्या वळवी, फोज्या खाअल्या वळवी, किरण फोज्या वळवी, नारसिंग सायसिंग वळवी, अमर तुमड्या वळवी, स्वप्नील तुमड्या वळवी, माधव फोज्या वळवी या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण महाले करीत आहे.








