नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर, आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नस संच (दिवाळी किट ) रुपये शंभर मात्र या दराने शासनाकडून उपलब्ध होणार आहे.
दिवाळी सणासाठी प्राप्त होणारे शिधाजिन्नस पात्र शिधापत्रिकाधारकांना विहीत कालावधीत वितरीत करण्यासाठी तसेच शिधाजिन्नस बाबत तक्रार नोंदविण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यासाठी रमेश वळवी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ( 8975838068), नवापूर पंकज खैरनार, पुरवठा निरीक्षण अधिकारी ( 8308909331), शहादा धिरज मेश्राम, पुरवठा निरीक्षण अधिकारी (9822873774) तळोदा प्रमोद डोईफोडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी (9623327074), अक्कलकुवा गुलाब बागले, पुरवठा निरीक्षण अधिकारी (9011896049) तर अक्राणीसाठी हितेश ढाले, पुरवठा निरीक्षण अधिकारी (7972358334 ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे. रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) घेतल्याची पावती घेवून संचात 4 पाकीट असल्याची खात्री करावी. शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस बाबत काही तक्रार असल्यास वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.








