Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. आमश्या पाडवी यांचा दबदबा

team by team
October 18, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. आमश्या पाडवी यांचा दबदबा

अक्कलकुवा l प्रतिनिधी

 

अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी अक्कलकुवा तहसील कार्यालयात संपन्न झाली. यातील १५ ग्रामपंचायतींवर शिवसेना, १३ ग्रामपंचायतीवर भाजपा, तीन ग्रामपंचायतींवर अपक्ष तर उर्वरित ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे.
तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.

 

 

काल झालेल्या मतदानाच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी 10.30 वाजता सुरु झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी 15 टेबलवर 30 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. 11 फेरीत मतमोजणी पुर्ण झाली. आधीच कोयलीविहिर ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे 44 थेट सरपंच पदासाठी व 409 सदस्यासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली होती.

 

 

15 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने,13 ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला असुन 3 ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवाराला सरपंच पदाची संधी मिळाली तर उर्वरित ग्रामपंचायती या काँग्रेस पक्षाकडे गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

खडकापाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 2 उमेदवारात सरळ लढत होती. मतमोजणीत दोन्ही उमेदवारांना सारखी मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यात टिमकीबाई ईश्वर वसावे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. याच ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक 2 मधुन तीन सद्स्य निवडुन द्यायचे होते. त्यामुळे एका सदस्याला जास्त मते असल्याने विजयी घोषित करण्यात आले तर उर्वरित दोन उमेदवारांना सारखी मते मिळाल्याने त्यांची ईश्वर चिठ्ठीने सोडत काढण्यात आली. गंगापूर येथे ही प्रभाग क्रमांक 2 साठी ईश्वर चिठ्ठीने सोडत काढण्यात येऊन उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

 

 

मतमोजणीसाठी सकाळपासुन तहसिल कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्ते व नेते मंडळीचा वावर सुरु होता. प्रत्येक फेरी व ग्रामपंचायतनिहाय मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात सोडले जात होते. मात्र प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तर निकाल ऐकण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या आवारात लाऊड स्पीकर लावण्यात आले होते.

 

 

प्रतिष्ठित उमेदवारांचा पराभव
गंगापुर ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या विद्यमान सरपंच नोंगाबाई वसावे यांचा पराभव झाला. या ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी उप सभापती विजय पाडवी यांच्या स्नुषा व विद्यमान पंचायत समिती सद्स्य लक्ष्मी पाडवी यांचादेखील पराभव झाला. खटवानी ग्रामपंचायतीमध्ये नुकतेच शिवसेनेत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मंगलसिंग वळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या कुंदा वसावे यांचे पती नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंद वसावे यांना ही पराभवाची चव चाखावी लागली. निवडणूकीत शिवसेनेत प्रचंड जोष होता. मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकले नाही.

 

 

2 ग्रामपंचायतीत काही लोकांनी बोगस मतदान केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र त्या मतदानाच्या दिवशी न केल्यामुळे त्या विचारात घेण्यात आल्या नाहीत.
शिवसेनेचे काही ग्रामपंचायती निवडून आल्यानंतर संपर्क कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. तहसिल कार्यालयाच्या मागे असलेल्या पटांगणात कार्यकर्ते बेभान होऊन जल्लोष करीत होते. मतमोजणीसाठी सरदार सरोवर प्रकल्पाचे उप जिल्हाधिकारी प्रकाश थविल निरीक्षक म्हणून उपस्थित होते. निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे आदींनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

Next Post

नवापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस तर २१ ग्रा.पं.वर भाजपाचा दावा

Next Post
नवापूर तालुक्यातील २८  ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस तर २१ ग्रा.पं.वर भाजपाचा दावा

नवापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस तर २१ ग्रा.पं.वर भाजपाचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add