नंदुरबार l प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्त नंदुरबार येथील बस स्थानकावर भल्या पहाटे साडेपाच वाजता नंदुरबार जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, राकेश कलाल, महादू हिरणवाळे आणि वितरण अधिकारी प्रमोद पाटील, सचिन जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रमाकांत पाटील यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेता बांधवांना पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून सन्मान करण्यात आला. दैनंदिन बातम्या संकलित करून वृत्तपत्र प्रतिनिधी त्या प्रसिद्ध करतात. मात्र वाचकांपर्यंत भल्या पहाटे तीनही ऋतूंमध्ये सातत्याने वृत्तपत्र पोहोचवण्याचे कर्तव्य निभावणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा असून त्यांच्या कार्यास सलाम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी राकेश कलाल, प्रमोद पाटील, महादू हिरणवाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण वाणी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य आणि नंदुरबारचे सल्लागार उमेश वाणी, नंदुरबार शहराध्यक्ष किशोर देसाई, उपाध्यक्ष नासिर खान, सचिव राजेश काशीद, प्रसाद महाजन, नितीन वसईकर, योगेश पंडित, रफिक मणियार, प्रशांत भालेराव, प्रवीण मोरे, दीपक कुलकर्णी, मनीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, कैलास पाटील, सुनील माळी, भावेश पाटील, सूर्यकांत खैरनार, आदी उपस्थित होते.








