नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातून दोन अल्पवयीन युवतींना पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथून अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. मजुरी करणाऱ्या कुटुंबातीलच मुलगी आहे. आई-वडील मजुरी करण्यासाठी गेले असता मुलगी घरातून बेपत्ता झाली. तिचादेखील ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कमलाकर चौधरी करीत आहेत.
दरम्यान दुसऱ्या घटनेत नंदुरबारात मजुरी करणाऱ्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीस आदेश सचिन मिश्रा, रा. सिंधी कॉलनी या युवकाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी केली. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसात आदेश मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण कोळी करीत आहेत.दरम्यान दोन दिवसात धडगाव तालुक्यातून दोन व नंदूरबार तालुक्यातून दोन अल्पवयीन युवतींना पळविल्याची घटना घडली आहे.








