शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित खान्देश स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत तीन गटात एकूण 153 स्पर्धक सहभागी झाले.यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक तसेच सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी सकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई दीपक पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, संचालक रमाकांत पाटील, मयूरभाई पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय पाटील, विविध विद्या शाखांचे प्राचार्यांची प्रमुख उपस्थिती होती
.प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले.चेस बोर्डवर चाल चालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.स्पर्धेत तीन गटात एकूण 153 स्पर्धक सहभागी झाले. विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.यशवंत शिरसाठ यांनी केले.आभार प्रा.डाॅ.अरविंद कांबळे यांनी मानले.बुद्धिबळ स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्राचार्य व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदाने सहकार्य केले.

बुद्धीबळ स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा-








