Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

team by team
October 13, 2022
in राज्य
0
तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

मुंबई  l

 

 

महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केली आहे.

 

 

 

 

 

 

दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील सजग नागरिक राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय दिव्यांग रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला.

 

 

 

 

 

 

तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाचे सोशल मीडिया प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या राहण्याची व्यवस्था केली.

 

 

 

 

सजग नागरिक आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे अधिकारी असतील तर सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतात एवढे मात्र नक्की.

 

 

 

 

 

 

मी महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ रिप्लाय आला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या सोशल मीडिया टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– राहुल जाधव, सजग नागरिक, पुणे.

 

 

 

एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.

– रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

बातमी शेअर करा
Previous Post

धक्कादायक निकाल : शहादा पं.स.त काँग्रेसचे संख्याबळ असताना भाजपची सत्ता

Next Post

राज्यपालांच्या हस्ते वसंत तडवी यांना पोलीस शौर्य पदक

Next Post
राज्यपालांच्या हस्ते वसंत तडवी यांना पोलीस शौर्य पदक

राज्यपालांच्या हस्ते वसंत तडवी यांना पोलीस शौर्य पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add