नंदूरबार l प्रतिनिधी
सर्वात धक्कादायक निकाल शहादा पंचायत समितीमध्ये लागला असून काँग्रेस पक्षाची सत्ता व संख्या बळ असूनही अंतर्गत वादामुळे चार सदस्य फुटल्याने भाजपच्या ताब्यात सत्ता गेली आहे. शहादा पंचायत समिती सभापती पदी वैजाली गटातील भाजपचे सदस्य वीरसिंग ठाकरे यांची निवड झाली आहे, तर उपसभापती पदी भाजपच्या सदस्या कल्पना श्रीराम पाटील यांची उपसभापती पदी निवड झाली आहे.
नंदुरबार, शहादा पंचायत समिती संख्याबळ व सत्ता असूनही अंतर्गत वादामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर रहावे लागले.काँग्रेसचे चार सदस्य फुटल्याने भाजपचा सभापती व उपसभापती पदी निवड झाली आहे.
संख्याबळ जास्त असुनही अंतर्गत वादामुळे शहादा पंचायत समितीत कॉग्रेसला सत्ता काबीज करता आली नाही. शहादा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी आणि उपसभापतीपदी भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. २८ सदस्य संख्या असलेल्या शहादा पंचायत समितीमध्ये कॉग्रेसचे 14 राष्ट्रवादीचे २ तर भाजपाचे १२ असे संख्याबळ आहे.
मात्र आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत कॉग्रेसच १४ सदस्य आणि राष्ट्रवादीचा ०१ असे १५ सदस्य अनुपस्थित राहीले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपाचे विरसिंग ठाकरे यांची निवड झाली. तर तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना भाजपाच्या १२ आणि राष्ट्रवादीचे ०१ असे १३ मते मिळाली आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी कॉग्रेसकडुन तब्बल ४ अर्ज देखील दाखल करण्यात आलेले होते. मात्र त्यांचे काही सदस्य भाजपाच्या गळ्याला लागल्याने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी कॉग्रेसचे संख्याबळ जास्त राहुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.