तळोदा l प्रतिनिधी
तळोदा,येथील पंचायत समितीचा सभापती पदासाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दोघा सदस्यांमध्ये लढत होवून भाजपचा मदतीने लताबाई वळवी या निवडून आल्या तर उप सभापती पदी भाजपचे विजयसिंह राजपूत बिनविरोध झाले.
तळोदा पंचायत समितीचा विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्या नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडी साठी गुरुवारी पंचायत समितीचा सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वाखारे यांचा उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीत सभापती पदासाठी काँग्रेसचा सोनीबाई रोहिदास पाडवी,लताबाई अर्जुन वळवी व सूपीबाई मोहन ठाकरे या तीन सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले होते.तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे चंदनकुमार दिवाकर पवार व भाजपचे विजयसिंह चतूरसिंग राजपूत या दोघांनी अर्ज दाखल केले होते.
माघार घेण्याचा मुदतीत सूपीबाई ठाकरे यांनी आपला अर्ज मागे घेतला.त्यामुळे काँग्रेसचा लताबाई वळवी व सोनीबाई पाडवी याचे अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवाजवी मतदान घेतले.यात लताबाई वळवी याना सहा मते तर सोनीबाई पाडवी याना चार मते पडली.त्यामुळे लताबाई वळवी याना अधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.तर उपसभापती पदासाठी चंदनकुमार पवार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने विजयसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या बैठकीस यशवंत ठाकरे,विक्रम पाडवी,दाज्या पावरा,ललिताबाई पवार,चंदन पवार, सूपीबाई ठाकरे,सोनीबाई पाडवी, कुसुंमबाई वळवी आदी उपस्थित होते सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी परशूराम कोकणी यांनी काम पाहिले.सहायक गट विकास अधिकारी बी के पाटील यांनी सहकार्य केले.
दरम्यान दहा सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत.गेल्या वेळी भाजपला चांस देण्यात आला होता.तर नंतरचा अडीच वर्षे काँग्रेसला संधी देण्यात आली होती.तथापि या पदासाठी काँग्रेसचाच सदस्यांमध्ये लढत झाल्याने काँग्रेस मधील दुही समोर आली आहे.मात्र काँग्रेसचा या दुफळी बाबत कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजीचा सुर व्यक्त केला होता.
काँग्रेसलाच मतदान केल्याचा भाजपचा दावा
दहा सदस्यीय तळोदा पंचायत समितीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले होते.साहजिकच समान बला मुळे अडीच,अडीच वर्षे सत्ता वाटून घेण्याचे फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांनी ठरविला होता.त्यामुळे पाहिले अडीच वर्ष भाजपचा सभापती तर काँग्रेसचा उपसभापती झाला होता.नंतरचा अडीच वर्षे काँग्रेसला सभापती पद देण्यात आले.त्यामुळे भाजपने सभापती पदासाठी आपल्या सदस्याचे नामांकन दखल केले नव्हते .परंतु काँग्रेसचा तीन सदस्यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी सूपीबाई ठाकरे माघार घेतली.शेवटी भाजपचा सदस्यांनी लताबाई वळवी याना मतदान केले.त्या निवडून आल्याने काँग्रेसचाच सदस्यास मतदान केल्याचा दावा भाजपने केला आहे.